गीत रचयित : कृ. र. सांगळे
Lyricist: K. R. Sangle
Book: Upasana Sangeet
Song No.: 7
Our Father
प्रभु, तव नाम सुवंदित गावें. ॥ ध्रु०॥
मर्त्य पतित मी, वंदुनि तुजला ।
मीं चिरकाल जगावें ! ॥ १ ॥
त्वदितर ऐसा कोण जयाला।
गाउनि नित्य तगावें ? ॥ २ ॥
निशिदिनिं करिसी उपकारच तूं, ।
हें कां मीं उबगावें ? ॥ ३ ॥
मज ताराया ख्रिस्त दिलासी, ।
तर तुज मीं उमगावें. ॥ ४ ॥
देसि सदात्मा मजला कीं मीं ।
तव मागीं न डगावें. ॥ ५ ॥
सदया, सज दे दान असें कीं ।
तव मुख नित्य बघावें. ॥ ६ ॥
Download Lyrics👇

