गीत रचयित : रेव्ह. ना.वा. टिळक
Lyricist: Rev. N.V. Tilak
Book: Upasana Sangeet
Song No.: 9
God Our Father
सुचेना आम्हांला नांवांची लाखोली,।
मति ही रंगली एक्या नांवीं. ॥ १ ॥
आम्ही तुज म्हणूं बाप ! बाप ! बाप !
स्फूर्ति ही अपाप लेकुराची ॥ २ ॥
विश्वाचा तूं कर्ता, विश्वाचा तूं नाथ, ।
आमुचा तूं तात परी, देवा ! ॥ ३ ॥
आम्ही देहातीत आत्म्यानें जन्मलों, ।
तुझे पुत्र झालों ख्रिस्तद्वारां. ॥ ४ ॥
दास म्हणे, बापा, ख्रिस्तें शिकविली ।
प्रार्थना पहिली अर्पू आधीं. ॥ ५ ॥
Download Lyrics👇

