गीत रचयित : रेव्ह. ना.वा. टिळक
Lyricist: Rev. N.V. Tilak
Book: Upasana Sangeet
Song No.: 11
The spacious firmament on high
विशाल, सुंदर नीलप्रभ हें अंतराळ ताऱ्यांहीं ।
मंडित अपुल्या जनकाचीं हो स्तोत्रें संतत गाई. ॥ १ ॥
कधीं श्रमेना ! सदा भ्रमे हा सूर्य पहा आकाशीं; ।
सदा वर्णितो निजजनकाचीं सामर्थ्ये तीं कैशीं. ॥ २ ॥
ह्या लोका मग त्या लोकाला जाउन दिनकर सांगे, ।
‘पहा, पहा रे! समर्थ कर तो पूर्ण किती अनुरागें !’ ॥ ३ ॥
दिनकर गेला, संध्याच्छाया आटोपी जगताला, ।
तोंच चंद्रमा स्तोत्र तेंच हो लागे मधु गायाला. ॥ ४ ॥
रात्रीं जेव्हां स्वस्थपणें ही पृथ्वी ऐकुन घेई, ।
जन्मकथा हा तेव्हां तीची अत्यानंदें गाई. ॥ ५ ॥
इकडे तिकडे, मागें पुढतीं शशिच्या तळपति तारे, ।
निजकक्षेतून लोटांगण जे घेती ग्रह हें सारे. ॥ ६ ॥
तेहि गर्जती, ‘खरें खरें हो खरेंच चंद्र वदे तें!’ ।
ध्रुवापासुनी ध्रुवास पुनरपि कथिती त्या सत्यातें. ॥ ७ ॥
तमोमया ह्या मर्त्य भूमिच्याभोंतीं अवघे फिरती, ।
गभीरसूकव्रता धरोनी शब्द न एकहि वदती. ॥ ८ ॥
यांच्या ह्या संदीप्तीं देशीं ध्वनी न ये ऐकाया, ।
तरी सदा हे हर्षभरानें स्तविताती प्रभुराया ! ॥ ९ ॥
विचारणेच्या कर्णी गर्जे ह्यांचा हा जयघोष, ।
‘कर्ता अमुचा कर देवाचा,’ ऐकुन तीहि सहर्ष ! ॥ १० ॥
Download Lyrics👇

