स्वर्गीय पित्याचें स्तवन
गीत रचयित : रेव्ह. ना.वा. टिळक
Lyricist: Rev. N.V. Tilak
Book: Upasana Sangeet
Song No.: 8
Sing unto the Lord
मीं तुज बाप सदैव म्हणावें. ॥ ध्रु०॥
सहस्त्र नामें शोभति तुजला, ।
काय तयांस करावें ? ॥ १ ॥
‘बाप चराचा तूं अचराचा !’ ।
वेड मला नच ठावें ! ॥ २ ॥
ख्रिस्तद्वारां लेकरुं तव मी ।
उमगुनि नित्य रमावें ॥ ३ ॥
तव वत्सलता वत्स म्हणे मज, ।
हें नच मीं विसरावें. ॥ ४ ॥
जिकडे तिकडे मज भावंडें, ।
परकें कोणि नसावें. ॥ ५ ॥
तव वत्साला साजे ऐसें ।
शील मदीय असावें. ॥ ६ ॥
मजला केला तव, त्या ख्रिस्ता ।
मीं मत्प्राण गणावें. ॥ ७ ॥
Download Lyrics👇