गीत रचयित : रेव्ह. ना.वा. टिळक
Lyricist: Rev. N.V. Tilak
Book: Upasana Sangeet
Song No.: 5
Arise my soul, and praise the Lord of day and night!
ऊठ ऊठ माझ्या जिवा, । वंदुनि दिनरजनीच्या धवा, ।
आयुर्मागी आक्रम नवा, । कर गौरवा देवाच्या. ॥ १ ॥
रजनी रमली प्रभुचिंतनीं, । रमला दिन हा प्रभुसेवनीं, ।
रमलीं उभयें त्याच्या चरणीं । तुज घेउनी संगातें ! ॥ २ ॥
जें जें येइल पुढतीं अतां । ‘ख्रिस्तार्पण तें,’ हो बोलता, ।
भाव ठेवुनी, जीवा, पुरता । चरणांवरती येशूच्या. ॥ ३ ॥
येशू ऐसा मित्र न कुणी, । पाही अवघें जग धुंडुनी ! ।
नेइल तुज तो सांभाळुनी, । जा मागुनी तूं त्याच्या. ॥ ४ ॥
करील तारण, संगोपन, । शिक्षण, तव तो श्रमनोदन, ।
ग्लानी येतां संजीवन, । संबोधन भ्रमतांना ! ॥ ५ ॥
साधक येशू, तूं साधन, । तयास अवघें साध्यज्ञान; ।
करुनी अपुलें समर्पण, । क्रम हा दिन तत्संगें. ॥ ६ ॥
Download Lyrics👇

