मार्येचें स्तोत्र
गीत रचयित : आनंदीबाई
Lyricist: Anandibai
Book: Upasana Sangeet
Song No.: 6
Mary’s Psalm of Praise-Magnificat
पवित्र त्याचें नाम सदाचें, किती धन्यता मज दिधली ! ।
भिउनि तयाला वागति त्यांतें दया दाखवी पूर्ण बली. ॥ ध्रु०॥
निजबाहुंची शक्ति तयानें जगा कितिकदां दाखविली, ।
गर्विष्ठांचीं गर्वपूर्णशीं हृदयें त्यानें भेदियलीं. ॥ १ ॥
ऐश्वर्यानें प्रमत्त ऐशां राजां रंकचि बनवि झणीं,
रंकांलागी बनवी राजे ऐश्वर्यचि त्यां देवोनी, ॥ २ ॥
श्रीमंतांतें रिक्त करांनीं देत मागुती लावोनी, ।
बुभुक्षितां परि सुंदर अन्ने संतोषवितो पूर्ण मनीं. ॥ ३ ॥
Download Lyrics👇