गीत रचयित : रेव्ह. ना.वा. टिळक
Lyricist: Rev. N.V. Tilak
Book: Upasana Sangeet
Song No.: 2
We praise Thee, O God !
मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान, ।
मंगल सेवा मांगल्याचें, देवा, तूंच निधान ! ॥ १ ॥
अंतर्यामीं, खाली, वरतीं, मागें, पुढतीं ऊर्मी, ।
प्रेमसागरा, तुझ्या खेळती, मीन त्यांतले आम्ही. ॥ २ ॥
हें तृण, हे तरु, हे गिरि, हें नभ, विश्व दिसे, न दिसे तें।
त्या प्रेमाच्या मधुलहरींनीं थवथबलेलें नुसतें ! ॥ ३ ॥
मी तव, माझें गान तुझें, हैं ऐकणार जे तेही ।
तुझेच, देवा ! तुझेच तूं हें सांभाळुनियां घेई. ॥ ४ ॥
राज्य तुझें, तव महती अवघी, बल, विक्रम तव, देवा !।
एक सुखद अधिकार आमुचा कीं करिजे तव सेवा ! ॥ ५ ॥
Download Lyrics👇

