गीत रचयित : रेव्ह. ना.वा. टिळक
Lyricist: Rev. N.V. Tilak
Book: Upasana Sangeet
Song No.: 10
The Love of God
मायबाप शब्द दीन ।
तुझ्या प्रेमाचें व्यंजन. ॥ १ ॥
नाहीं, शब्दाधीन नाहीं ! ।
नाहीं कोणत्या उपायीं ! ॥ २ ॥
अनिर्वाच्य तुझी प्रीति ।
कळे येतांना प्रतीती. ॥ ३ ॥
बाप म्हणावें ईश्वरा, ।
दृश्य व्यवहार सारा. ॥ ४ ॥
दास म्हणे, तुला ‘प्रीति’
नांव शोभे जगत्पति. ॥ ५ ॥
Download Lyrics👇

