गीत रचयित : रेव्ह. ना.वा. टिळक
Lyricist: Rev. N.V. Tilak
Book: Upasana Sangeet
Song No.: 4
A Morning Hymn
प्रातःकाळीं वंदू तुला, । देवा, विश्वेशा मंगला, ।
बापा शरणागतवत्सला । प्रेमाब्धीला आनंदें. ॥ १ ॥
रात्रीं आम्हां सांभाळिलें, । निद्राविश्रांतीला दिलें, ।
रजनी सरतां संबोधिलें, । सावध केलें त्वां, देवा. ॥ २ ॥
सृष्टी उपकारां मानिती, । करिते बापा, तव संस्तुती; ।
दूत तुझे हे स्वर्गी गाती। देवा, महती तव हर्षे ! ॥ ३ ॥
ह्यांच्या गानीं हा आपुला । आम्हीं सूर मिळवुनी दिला, ।
भक्ती प्रिय तुज, न तशी कला। हें आम्हांला ठाऊकें. ॥ ४ ॥
नूतन दिन हा आम्हांप्रती । देशी, दिनरजनीच्या पती, ।
तव आत्म्यानें प्रेरितमती । हा योजिती होऊं दे. ॥ ५ ॥
Download Lyrics👇

