गीत रचयित : बा. ल. साळवी
Lyricist: B.L.Salvi
Book: Upasana Sangeet
Song No.: 3
The Lord’s Prayer
अगा आमुच्या स्वर्गनिवासी बापा, सदया, परमेशा, ।
पवित्र तुझें नाम राखिलें जावो जगतीं, जगदीशा ! ॥ १ ॥
राज्य तुझें येउं दे शुभप्रद, भूस्वर्गाचें ऐक्य करी, ।
जशी तवेच्छा स्वर्गों चाले, तशीच चालो पृथ्विवरी. ॥ २ ॥
अन्न आमुचें प्रतिदिवसाचें आज दे, विभो, आम्हांतें,
अन्न सुधेसम मातृकराने मुखांत पडतां बाळातें. ॥ ३ ॥
आम्ही अपुल्या अपराध्यांची क्षमा करीतों जशि जितुकी ।
तुंही अमुचा क्षमा करीं, बा क्षमानिधे, तैशी तितुकी. ॥ ४ ॥
नको परीक्षेमध्यें पाडूं, मोहपाशसंताप हरीं, ।
जें जें वाइट तयापासुनी तूं आम्हांला दूर करीं. ॥ ५ ॥
राज्य आणि सामर्थ्य तुझे, तव गौरव केवळ तूंच धनी, ।
तथास्तु गातो स्वर्ग सर्वदा; तथास्तु वदते ही अवनी. ॥ ६ ॥
Download Lyrics👇

