गीत रचयित : रेव्ह. ना.वा. टिळक
Lyricist: Rev. N.V. Tilak
Book: Upasana Sangeet
Song No.: 1
Holy, Holy, Holy, Lord God Almighty!
परमपवित्रा सर्वसमथों जगन्नायका प्रभु देवा, ।
प्रभातसमयीं मंगलगीतें करित्तों आम्ही तव धावा. ॥ ध्रु०॥
परमपवित्रा, दयासागरा, पराक्रमाचा तूं ठेवा, ।
व्यक्ति त्रय तव एक परी तूं, तव महिमा आम्हीं गावा. ॥ १ ॥
मुकुट काढुनी तुला अर्जुनी, धरुनी सुखदायक भावा, ।
परमपवित्रा, पवित्र अवघे गाती, तव करिती सेवा. ॥ २ ॥
दूत तुझे साष्टांग घालुनी स्तविती तुझिया मधु नांवा, ।
तूं होताशी, आजहि असशी, सदैव असशिल तूं, देवा. ॥ ३ ॥
परमपवित्रा, अंधकार जरि मनुजापुढतीं पसरावा, ।
पापमया दृष्टीस तयाच्या दर्शनलाभ न तव व्हावा. ॥ ४ ॥
पवित्र तरि तूं, कुणी तुझ्याविण पवित्र न जगीं गवसावा, ।
प्रेमबलानें पावित्र्यानें सदा पूर्ण तूं, विश्वधवा ! ॥ ५ ॥
परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभु देवा, ।
भूस्वगर्गों, सागरीं तुझ्या ह्या कृति गाताती तव नांवा. ॥ ६ ॥
परमपवित्रा, दयासागरा, पराक्रमाचा तूं ठेवा, ।
व्यक्ति त्रय तव एक परी तूं, तव महिमा आम्हीं गावा. ॥ ७ ॥
Download Lyrics👇

